राज्यातील दुष्काळाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला असून पिण्याच्या पाण्यासाठी तर आतापासूनच संघर्ष सुरू झाला आहे. दुष्काळाचे हे गांभीर्य लक्षात घेऊन ‘मित्र फाऊंडेशन’तर्फे  एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी ४ जानेवारी रोजी  सायंकाळी साडेसहा वाजता ‘पाणी पेटतय..’ या नावाने होणाऱ्या या परिसंवादामध्ये गोदावरी खोऱ्याचे तांत्रिक सल्लागार दि.मा. मोरे, लोकसहभागातून गावातील दुष्काळ दूर करणारे पोपटराव पवार तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे आपली भूमिका मांडणार आहेत. राज्यातील दुष्काळाची सद्यस्थिती दर्शविणारा एक माहितीपटही यावेळी दाखविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा