पंढरपूर नगरपरिषदेचे तीर्थक्षेत्र विकास महाआघाडीचे प्रभाग क्र. ७ मधून निवडून आलेले नगरसेवक नागेश प्रल्हाद यादव यांना पाच अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने पुणे अप्पर विभागीय आयुक्त वैद्य यांनी त्याचे पद रद्द केले आहे.
नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत हे न दाखवता दोन अपत्ये दाखवून निवडणूक लढवून विजयी झाले. या विरोधात सुधीर रणदिवे, पंढरपूर यांनी नागेश यादव यांनी प्रतिज्ञापत्र देताना दोनपेक्षा जास्त मुले आहेत हे लपवून ठेवले होते. यासंदर्भात १७ जानेवारी १२ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन चौकटी करून यादव यांच्याविरोधात निकाल दिला होता. त्या विरोधात नागेश यादव यांनी अप्पर आयुक्त पुणे यांच्याकडे अपील केले होते. सुनावणीदरम्यान आयुक्त यांना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोनपेक्षा जास्त अपत्ये (मुले) असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही. यादव यास पाच अपत्ये आहेत हे निदर्शनास आणून देण्यात आले.
आयुक्त पुणे यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन १९६५ कलम १६ अन्वये यादव यांचे नगरसेवकपद रद्द केले. या निकालामुळे तीर्थक्षेत्र विकास महाआघाडीस धक्का लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा