पनवेलच्या खड्डेमय रस्त्यांचा प्रवासाचा निपटारा नगर परिषद कधी लावणार हा नागरिकांसाठी प्रश्नच आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपासून विधानसभेची निवडणूक झाली. तरीही पनवेलच्या रस्ते बांधणीच्या शुभारंभचा मुहूर्त शोधूनही सापडत नसल्याने पनवेलकरांच्या नशिबी खड्डेमय प्रवास आला आहे. नगर परिषदेच्या सत्तारूढ व विरोधक सदस्यांनी लोकहितार्थ पनवेलकरांचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा सामान्यांची आहे.
पनवेलमधील आंबेडकर मार्ग ते शिवाजी चौक, टपालनाका, साई मंदिर ते कोहीनूर टेक्निकलपर्यंत, महाराष्ट्र बॅंक ते भाजप कार्यालयपर्यंतची दुरवस्था झाली आहे. बहरलेले पनवेल अशी संकल्पना मांडणाऱ्या नगर परिषदेने खड्डय़ातून वाट काढणाऱ्या नागरिकांची व्यथा जाणावी अशी अपेक्षा शंकर खेडकर या नागरिकांनी व्यक्त केली आहे. पनवेलच्या नगर परिषदेच्या सदस्यांनी हा प्रश्न प्राधान्यांनी सोडवावा अशी पनवेलकरांची मागणी आहे. या मार्गाचे काम होणार असल्याची चर्चा नगर परिषदेत होती. त्याविषयी निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर हे काम जैसे थे राहिले. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले. मात्र तांत्रिक अडचणीत अडकलेल्या या निविदेचे रूपांतर प्रत्यक्षात कामात झाले नाही. विरोधकांनीही तळमळीने हा प्रश्न न मांडल्याने या समस्येचा प्रश्न झाला. एमएमआरडीए पनवेलचे रस्ते करणार असल्याने आता एमएमआरडीएच्या कार्यप्रणालीवर पनवेलकरांना विसंबून राहावे लागणार आहे.
पनवेलकरांचा खड्डेमय प्रवास कधी संपणार?
पनवेलच्या खड्डेमय रस्त्यांचा प्रवासाचा निपटारा नगर परिषद कधी लावणार हा नागरिकांसाठी प्रश्नच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-01-2015 at 07:14 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes on navi mumbai road