माजी महापौर मनीषा भोईर, माजी महापारै अंजनी भोईर यांचे पती प्रभाकर भोईर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेता विजयानंद माने, भाजपचे युवा नेते वैभव नाईक व त्यांची बहीण वैशाली नाईक या नणंद-भावजयांची झुंज, गणेश नाईक यांच्या गावातून बोनकोडे येथून पहिल्यांदाच उभा राहिलेला नाईकव्यतिरिक्त उमेदवार आणि सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे आणि काँग्रेसचे अविनाश लाड यांची लढत या वीस मतदारसंघांत दिसून येणार आहे. माने यांच्या समोर राष्ट्रवादीचे किसन मोरे हे उभे असून पावण्यात माजी महापौर मनीषा भोईर यांची लढत ऐन उमेदवारी वाटपाच्या दिवशी शिवसेनेत उडी मारलेले विलास मुकादम यांची पत्नी सपना यांच्याशी होणार आहे. हरिभाऊ म्हात्रे यांचा सामना राष्ट्रवादीच्या लीलाधर पाटील यांच्याबरोबर आहे. प्रभाग क्रमांक ५१ मधील लढतीकडे सर्व नवी मुंबईचे लक्ष लागून आहेत. माजी मंत्री गणेश नाईक यांचे सख्खे पुतणे वैभव नाईक यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काकांना सोडचिठ्ठी देऊन प्रथम सेनेत आणि विधानसभा उमेदवारी न मिळाल्याने नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव नाईक यांची पत्नी वैष्णवी निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यांच्यासमोर त्यांची नणंद व वैशाली नाईक या वडिलांचे नाव घेऊन मैदानात राष्ट्रवादीच्या तिकिटावर उतरल्या आहेत. लोहा लोहे को काटता है या उक्तीप्रमाणे नाईक यांनी ही खेळी खेळली आहे. स्वत:चा प्रभाग महिला झाल्याने तो सुनेला देऊन स्वत: प्रभाग क्रमांक ६० मध्ये उभे राहिलेले शिवसेनेचे विठ्ठल मोरे यांची गाठ काँग्रेसच्या उत्तम जनसंर्पक असलेल्या अविनाश लाडबरोबर आहे. मोरे यांना मंडलिक यांचा अपशकुन झाला आहे. मंडलिक यांनी बंडखोरी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा