गेल्या सव्वाशे वर्षांपासून आजतागायत लोकप्रियता कायम राखलेल्या आणि रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ असलेल्या ‘संगीत सौभद्र’ या नाटकावर आधारित ‘सौभद्रायण’ हा कार्यक्रम १९ जुलै रोजी विलेपार्ले येथे रंगणार आहे. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या गोखले सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक व अभिनेते पं. प्रसाद सावकार यांना ‘पंचरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. फाऊंडेशनर्फे यंदापासून ज्येष्ठ कलावंताचा ‘पंचरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून पहिला पुरस्कार पं. सावकार यांना प्रदान केला जाणार आहे. सन्मानपत्र आणि पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते आणि संगीत समीक्षक व गायक अमरेंद्र धनेश्वर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ तबलावादक पं. शशिकांत ऊर्फ नाना मुळ्ये यांचाही पंचाहत्तरीच्या निमित्ताने या वेळी सत्कार करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा