यवतमाळ विधानसभा मतदार संघात मे महिन्याच्या उत्तरार्धात होऊ घातलेल्या पोटनिवडणूकीत महिलांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी काँगेस श्रेष्ठींकडे महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. गेल्या २७ जानेवारीला काँगेस आमदार निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनामुळे यवतमाळ मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक होत असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. काँगेसने सुध्दा मुंबईत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे नेत्यांची एक बठक आयोजीत केली होती. मात्र, संभाव्य उमेदवारासाठी झालेल्या चाचपणीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
विधानसभा पोटनिवडणूकीची सूचना निवडणूक आयोगाने निर्गमित केल्यानंतरच या संदर्भात निर्णय घ्यावा, असे या बठकीत एक मताने ठरले. पारवेकर घराण्यापकी नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नलिनी यांना उमेदवारी दिल्यास सहानुभूती लाटेचा मोठा फायदा काँगेसला मिळू शकेल, असा एक विचारप्रवाह असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. निलेश पारवेकर यांचे धाकटे बंधू योगेश पारवेकर यांनी उमेदवारीसाठी आपली आई कांताबाई देशमुख यांना सोबत घेऊन राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर दुदैवाने योगेश पारवेकर यांच्या पत्नी श्व्ोता यांचेही अकाली निधन झाले. पारवेकर कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आणि यातून पारवेकर कुटुंब अजुन सावरले नाही, याही गोष्टीची चर्चा झाली.
आता विधानसभा पोटनिवडणुकीत काँगेसने महिलांना संधी दिली पाहिजे, असाही एक विचार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि काँगेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतील पदाधिकारी संध्या सव्वालाखे यांच्या नावाची महिलांमध्ये जोरदार चर्चा आहे. परंतु, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर झालेल्या विधानसभेच्या १२ निवडणूका आणि दोन पोटनिवडणुकांमध्ये महिला उमेदवारांची स्थिती काय होती हे पाहण्यासारखे आहे. १९६२ च्या निवडणूकीत काँग्रेसने छबुताई उत्तमराव डहाके यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा अपक्ष उमेदवार जांबुवंतराव धोटे यांनी अवघ्या १ हजार मतांनी पराभव केला होता. १९६७, १९७२, १९७८, १९८० च्या निवडणूकीत एकही महिला उमेदवार उभी नव्हती. १९८५च्या निवडणुकीत मालतीबाई मधुकर पोहणकर अपक्ष म्हणून लढल्या आणि केवळ १५७ मते घेऊन अनामत गमावून पराभूत झाल्या होत्या. १९९० च्या निवडणुकीत काँगेसने विजयाताई धोटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्या जनता दल उमेदवार अण्णासाहेब पारवेकर यांच्याकडून पराभूत होऊन दुसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या. या निवडणूकीत शांताबाई अशोक अंबाडकर ही आणखी एक महिला उभी होती पण तिला केवळ ४२ मते मिळून अनामत जप्त झाली होती.
१९९० ची निवडणूक लढण्यापूर्वी विजयाताई धोटे काँगेसच्या तिकिटावर १९८० सालच्या पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या. आबासाहेब पारवेकर यांच्या निधन झाली होती. १९९५ च्या निवडणूकीत शेतकरी संघटनेच्या प्रभावशाली कार्यकर्त्यां असलेल्या संध्या इंगोले, छबुताई मेघे, ज्योती काळे या तीन महिला अपक्ष म्हणून लढल्या. त्यापकी संध्या इंगोले ११०१ मते घेऊन पराभूत झाल्या. उर्वरित दोघींची अनामत जप्त झाली होती. यानंतर १९९९ च्या निवडणुकीत कवयित्री उषा भालेराव उभ्या होत्या. मात्र त्यांना फक्त १८७ मतदारांनी पसंती दिली होती. २००४ च्या निवडणुकीत पिपल्स रिपब्लिीकन पार्टीतर्फे वीणा हिरामण नागदिवे उभ्या होत्या तर अपक्ष उमेदवार म्हणून इंदूताई दातार व मीनाक्षी राठोड या दोन महिलांनी नशीब अजमावले. मतदारांनी या तिन्ही महिला उमेदवारांना सपशेल नाकारले. यवतमाळ विधानसभा मतदार संघात १९८० च्या पोटनिवडणूकीचा एक अपवाद (विजयाताई धोटे) वगळता एकही महिला निवडून आली नाही. छबुताई डहाके यांचा एक अपवाद वगळता कोणतीही पराभूत महिला अनामतसुध्दा वाचवू शकली नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर महिलांना उमेदवारी मिळावी या मागणीचा काँगेस श्रेष्ठी कितपत गांभीर्याने विचार करतात हाही चच्रेचा विषय आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा