* सव्वा चार किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग
* फेब्रुवारीत निविदा, ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प
शिवडी-न्हावाशेवा या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला केंद्र सरकारकडून व्यवहार्यता तफावत निधी मिळाल्यामुळे या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना वरळीमार्गे थेट या सागरी सेतूच्या आरंभी शिवडीपर्यंत पोहोचवणाऱ्या वरळी ते शिवडी या सव्वा चार किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्ग प्रकल्पाचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात या उन्नत मार्गाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणारा आहेत.
वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम हे शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या बरोबरीने सुरू करायचे आणि सागरी सेतू पूर्ण होण्यापूर्वी संपवायचे असे प्राधिकरणाचे नियोजन आहे. सागरी सेतू प्रकल्पाबाबतच्या चर्चेवेळी त्यासाठी पात्र ठरलेल्या इच्छुक पाच समूहांतील गॅमन इंडिया, एचसीसी, एल अँड टी, जीव्हीके, जीएमआर आदी विविध कंपन्यांनी वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामाविषयी उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे देशातील नामवंत कंपन्या या उन्नत मार्गाच्या बांधणीत पूर्वीपासूनच इच्छुक असल्याने निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळेल आणि नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ पर्यंत वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे बांधकामही सुरू होईल, असे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
या मार्गामुळे पश्चिम उपनगरांतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई, पुणे, गोव्याकडे जाण्यासाठी थेट व जलदगती मार्ग उपलब्ध होईल. शिवाय मुंबईत पूर्व-पश्चिम दिशांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग त्यामुळे उपलब्ध होईल. लाखो वाहनांचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. हा उन्नत मार्ग बांधण्यासाठी ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
आता वरळी-शिवडी उन्नत मार्गाची तयारी!
* सव्वा चार किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग * फेब्रुवारीत निविदा, ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प शिवडी-न्हावाशेवा या २२ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला केंद्र सरकारकडून व्यवहार्यता तफावत निधी मिळाल्यामुळे या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-01-2013 at 11:36 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparing for worli sewri sea link