येथील अँग्लो हिंदी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रमोद खर्च यांनी कोनाचे तीन भाग करणारे कोन त्रिभाजक हे नावीन्यपूर्ण उपकरण तयार केले आहे.  यापूर्वी भूमितीत कोनाचे तीन समान भाग करण्याचे अनेक प्रयत्न गणितज्ज्ञांनी केले, परंतु त्यात त्यांना यश आले नव्हते. खच्रे यांनी संशोधनपूर्वक ते तयार करण्यात यश प्राप्त केले आहे.
या उपकरणात दोन आयताकृती पट्टय़ा एकमेकांना लंब राहतील, अशा विशिष्ट पध्दतीने जोडल्या आहेत. एका आयताकृती पट्टीवर एका बाजूला कोनमापकाची रचना केली आहे.  सोबत तीन कोन तयार होतील, यासाठी चार पट्टय़ा स्वतंत्र केल्या आहेत. एका विशिष्ट पध्दतीने कोनाचा शिरोिबदू उभ्या पट्टीवर ठेवला असता आणि अन्य कोनाच्या बाजू कोनमापकावर ठेवला असता दिलेल्या कोनाचे तीन समान भाग सहज होताना दिसतात. हे उपकरण त्रिमितीय असून ते हाताळावयास विद्यार्थी व शिक्षकांना अतिशय सोपे आहे. या उपकरणाच्या मागील बाजूस संबंधित कोन त्रिभाजनाची सिध्दताही अंकित केली आहे.  प्राचार्य खच्रे गेली ३८ वष्रे गणित विषय शिकवित असून, आपल्या गणित अध्यापनाच्या अनुभवातून आणि चिंतनातून त्यांनी आतापर्यंत विशिष्ट अंकाचे घडय़ाळ यासारखी अनेक गणितीय उपकरणे यापूर्वीही तयार केली आहेत. यात त्यांना अमेय दीपक अग्रवाल या विद्यार्थ्यांची मोलाची मदत झाली. त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांचे मराशिपचे जिल्हा संघटनमंत्री नितीन खच्रे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गणित शिक्षक विजय सातपुते, विनोद संगीतराव, नरेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे.

Story img Loader