राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक एक दिवसांचे वेतन दुष्काळग्रस्तांसाठी देणार आहेत. मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पंडित यांनी ही माहिती दिली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाची बैठक पुणे येथे महामंडळाचे अध्यक्ष सुभाष माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या निर्णयाचा ठराव करण्यात आला. सर्व मुख्याध्यापकांनी एप्रिल किंवा मे २०१३ च्या वेतन देयकात एक दिवसाची कपात करुन पगार बिले सादर करावीत, असे जिल्हा सरचिटणीस शांताराम डोंगरे यांनी अवाहन केले.
मुख्याध्यापक हे प्रशासकिय पद असुनही त्यांना केंद्र सरकारप्रमाणे वेतनश्रेणी राज्य सरकारने दिली नाही. महामंडळाने त्रुटी समितीकडे दाद मागितली मात्र बक्षी समितीने संरचनेत बदल न केल्याने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे पंडित यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा