टीएमटीचा महागणार
ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बसेसमधील प्रवासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भाडेवाढीस मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविल्याने या दोन्ही उपक्रमाच्या तिकीटदरांमधील भाडेवाढीची प्रक्रिया सुरू झाली असून यापैकी केडीएमटीने बुधवारी सकाळपासून ही दरवाढ अमलात आणली. ठाणे परिवहन उपक्रमातील दरवाढीच्या प्रस्तावास गुरुवारी हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. त्यानंतर लगेच तिकीट दरवाढ लागू केली जाईल, अशी माहिती टीएमटीचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी वृत्तान्तला दिली.
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने या दोन्ही परिवहन उपक्रमांच्या प्रस्तावित भाडेवाढीस यापूर्वीच हिरवा कंदील दाखविला आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे परिवहन उपक्रमास भाडेवाढ अमलात आणता यावी, यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया गुरुवापर्यंत पूर्ण केली जाईल, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी एन.के.पाटील यांनी वृत्तान्तला दिली. भाडेवाढीवर मंजुरीची अंतिम मोहर उमटताच कोणत्याही क्षणी तिकीट दरवाढ लागू करण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणांना असणार आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने दोन महिन्यांपूर्वीच प्रवासी भाडेवाढीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. डिझेल तसेच सीएनजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होताच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने काही महिन्यांपूर्वी तिकिटांच्या दरात वाढीचा निर्णय घेतला. नवी मुंबईपाठोपाठ ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाने प्रत्येक टप्प्याला दोन ते चार रुपयांच्या भाडेवाढीचा प्रस्ताव संमत केला. ठाणे परिवहन उपक्रमाने बऱ्याच वर्षांपासून आपल्या तिकिटांच्या दरांमध्ये वाढ केलेली नाही. महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उपक्रमाने या संबंधीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, तो प्रलंबित ठेवणाऱ्या सर्वपक्षीय सदस्यांनी निवडणुका होताच त्यास हिरवा कंदील दाखविला. दरम्यान, या दोन्ही प्राधिकरणांचे भाडेवाढीचे प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे प्रलंबित होते. या प्रस्तावांना ‘एमएमआरटीए’ने हिरवा कंदील दाखविल्याने भाडेवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या प्रस्तावांना एमएमआरटीएने हिरवा कंदील दाखविला असला तरी यासंबंधीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती ठाण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी एन.के.पाटील यांनी वृत्तान्तला दिली. मंजुरीच्या प्रस्तावाला गुरुवापर्यंत हिरवा कंदील दाखविण्यात येणार असून त्यानंतर ही भाडेवाढ लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही पाटील यांनी सांगितले. दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने बुधवारी सकाळपासून भाडेवाढ अमलात आणली. ही भाडेवाढ १५ ते २० टक्के इतकी आहे. पहिल्या टप्प्यासाठी एक रुपया आणि त्यानंतरच्या भाडय़ात ही वाढ झाली आहे. अचानक ही भाडेवाढ लागू झाल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. डोंबिवली एमआयडीसीतील प्रवासाचे भाडे सहा ते नऊ रुपये झाले आहे. परिवहन उपक्रमाचा खर्च ४५ ते ५० टक्के असल्याने ही भाडेवाढ नगण्य असल्याचे केडीएमटीमधील सूत्रांनी सांगितले.
केडीएमटीचा प्रवास महागला..
ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या बसेसमधील प्रवासासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भाडेवाढीस मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविल्याने या दोन्ही उपक्रमाच्या तिकीटदरांमधील भाडेवाढीची प्रक्रिया सुरू झाली असून यापैकी केडीएमटीने बुधवारी सकाळपासून ही
First published on: 21-03-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prise hike of kdmt taravel