मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या रविवारी (दि. ५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कराड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीचे उद्घाटन, कराड-ओगलेवाडी व बनवडी फाटा रस्त्याचे चौपदरीकरण प्रारंभ, ओंड येथे समाधान योजनेतून विविध दाखल्यांचे वाटप, तसेच सैदापूर येथे मुख्यमंत्र्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सुवर्णजयंती राजस्व योजनेंतर्गत शासनाच्या विविध योजनांचे लाभ, अनुदान वितरणाचा कार्यक्रम ओंड येथे पंडित वल्लभपंत हायस्कूलच्या प्रांगणात रविवारी सकाळी साडेनऊला होईल. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, पालकमंत्री शशिकांत शिंदे, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, खासदार उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एस. पऱ्हाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर आदींसह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती राहील. दरम्यान, कराड येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह, न्या. रणजीत मोरे, मनोज संकलेचा तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण उपाध्ये यांच्या उपस्थिती होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक न्या.पिराजीराव भावके व कराड वकील संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड सयाजीराव पाटील हे आहेत. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा