संस्थाचालकाच्या जाचास कंटाळून होळ येथील खासगी विद्यालयातील लिपिक व्यंकट घुगे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. परळी औष्णिक केंद्राच्या राख हाताळणी विभागातील कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर अरविंद पांडुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
होळ (तालुका केज) येथील होळेश्वर विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या व्यंकट बळीराम घुगे (वय ५५) यांनी गेल्या १० नोव्हेंबरला विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. मयताचा मुलगा श्रीनिवास घुगे यांच्या तक्रारीत संस्थाचालकाच्या जाचास कंटाळून वडिलांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी बाळासाहेब भागवत शिंदे व अन्य दोघांविरुद्ध सोमवारी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दाऊदपूर शिवारातील नवीन औष्णिक केंद्रातील राख हाताळणी विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर अरविंद पांडुळे यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. लातूर जिल्ह्य़ातील दापोली (तालुका औसा) हे त्यांचे मूळ गाव असून आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.    

Story img Loader