पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसखरेदीसाठी कंपनीला द्यावयाची रक्कम मिळत नसल्याने निर्माण झालेला तिढा सुटला असून िपपरी पालिकेने ५ कोटी १६ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. स्थायी समितीच्या येत्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर तयार अवस्थेत असलेल्या त्या बस पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट होऊ शकणार आहेत.
िपपरी पालिकेच्या २०१२-१३ च्या अंदाजपत्रकात ‘जेएनयूआरएम’ च्या कामांचा हिस्सा म्हणून असलेल्या १५० कोटी तरतुदीतून पाणीपुरवठा टप्पा-१ साठी असलेल्या ७४ कोटी ५० लाख रुपयांमधून पीएमपीएलला ही रक्कम देण्यात येणार आहे. शासनाकडून अद्याप न मिळालेले अनुदान प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम समायोजित करून घेण्यात येईल, या उमेदमान्यतेवर ही रक्कम यावी तसेच केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर सदरच्या लेखाशीर्षांवर ती रक्कम जमा करण्यात येईल, असे याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे.
‘जेएनयू’ अंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या बसखरेदीसाठी शासनाकडून अनुदान न मिळाल्याने हा तिढा निर्माण झाला होता. िपपरी-चिंचवडसाठी देण्यात येणाऱ्या १५० पैकी २२ बस यापूर्वीच वापरात आल्या आहेत. मात्र, त्याचे पैसे कंपनीला अद्याप देण्यात आले नव्हते. नव्याने येणाऱ्या २१ पैकी १४ बस तयार होत्या. मात्र, पैसे न मिळाल्याने कंपनीकडून त्याचा ताबा देण्यात येत नव्हता. या संदर्भात पीएमपीने महापालिकेशी सातत्याने पत्रव्यवहार केला व आर्थिक रक्कम देण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, यामध्ये तोडगा काढण्यात आला. शासनाकडून पैसे मिळेपर्यंत िपपरी पालिकेने ते द्यावेत व शासनाचे पैसे आल्यास ते त्यांनी वळते करून घ्यावेत, असे ठरले. त्यानुसार, महापालिकेने तयारी दर्शवली असून  याबाबतचा प्रस्ताव एक डिसेंबरच्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पीएमपीला पाच कोटी रुपये देण्याचा व पर्यायाने त्या तयार असलेल्या बस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
स्थायी समितीच्या आगामी बैठकीत १११ विषय असून त्यामध्ये मोठय़ा खर्चाचे अनेक प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. शहरातील काही भागात रस्त्यातील खांब व तारा हलवण्यासाठी सहा कोटी तर प्रकाशव्यवस्थेच्या नूतनीकरणासाठी तीन कोटी खर्च होणार आहेत.     
िपपरीत १६ जानेवारीपासून ‘पवनाथडी जत्रा’
िपपरी महापालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी बहुचर्चित पवनाथडी जत्रा यंदा डिसेंबरऐवजी नव्या वर्षांत १६ ते २१ जानेवारी दरम्यान एच. ए. कंपनीच्या मैदानावर होणार आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. ही जत्रा कुठे घ्यायची, यावरून नेहमी रस्सीखेच होत असल्याचे चित्र आतापर्यंत दिसून आले आहे. यंदा ती िपपरीत होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा