वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेच्या मार्गावर वसरेवा ते विमानतळ मेट्रोस्थानकापर्यंतचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१३ मध्ये सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या परवानग्या मिळवण्याचे काम सुरू झाले आहे. त्याअंतर्गत मेट्रो मार्गाच्या बांधकामाला व आराखडय़ाला ‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेश’ने मान्यता दिली        आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेच्या मार्गाची लांबी  ११.४० किलोमीटर आहे. मेट्रो रेल्वेचे सहा मुहूर्त आतापर्यंत हुकले. त्यानंतर आता सप्टेंबर २०१३ पर्यंत निदान वसरेवा ते विमानतळापर्यंतचा पहिला टप्पा सुरू करण्याचे ‘मुंबई मेट्रोवन प्रा. लि.’ने ठरवले. तशी घोषणाही झाली.
 मेट्रो सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्ड आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी या दोन प्रमुख मंजुरी आवश्यक असतात. त्यापूर्वी बांधकाम व त्याच्या आराखडा व्यवस्थित असल्याची मंजुरी, सिग्नल यंत्रणा ठिकठाक असल्याची मंजुरी अशा नानाविध परवानग्या घेतल्या जातात. त्याअंतर्गतच बांधकाम व आराखडा व्यवस्थित असल्याची मंजुरी ‘रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेश’कडून घेण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा