अंकुर साहित्य संघ महाराष्ट्रच्या वतीने सरलाताई गहिलोत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अंकुर शोधपत्रकारितेतील उत्कृष्ट लेख पुरस्कारार्थ प्रा. मधुकर वडोदे यांना ‘झाडा कोंडमारा आज कृषकाचा गेला जीव त्याचा कुणापाशी..?’ या फिचरला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार कराडच्या ५१ व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनात दिला. याप्रसंगी संमेलनाच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद सिनगारे, सुरेश पाचकवडे, विजया पाटील, गणपतराव कणसे उपस्थित होते. रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 या साहित्य संमेलनात प्रा. मधुकर वडोदे यांनी मराठी भाषेच्या अभिवृध्दीसाठी मराठी साहित्य संमेलन गरजेचे आहेत काय, या विषयावरील परिसंवादात विचार मांडला.     

Story img Loader