आज मोठय़ाने विस्तार होणाऱ्या शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातील प्राध्यापकांनी पुढे येऊन आपली गुणवत्ता जगासमोर मांडावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.टी.ए.शिवारे यांनी ठाणे येथे केले. अखिल भारतीय वाणिज्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. शिवारे यांचा अलीकडेच समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
येथील टिपटॉप प्लाझा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार निरंजन डावखरे, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र, विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. राजपाल हांडे, डॉ. एम. जी. शिरहट्टी, डॉ. पी. डी. शिंदे, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान आणि आदर्श विकास मंडळाचे संचालक सचिन मोरे यांच्यासह मुंबईतील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य यावेळी उपस्थित होते. 

Story img Loader