अंबरनाथ संगीत सभेच्या वतीने रविवारी संध्याकाळी येथील ब्राह्मण सभा सभागृहात आयोजित विशेष पर्वात शहरातील बाल कलावंतांनी बहारदार गीतांची मैफल सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
मैफलीची सुरुवात स्वरांगी ठाकुरदेसाई हिच्या शास्त्रीय नृत्याने झाली. तिने गणराज नर्तन सादर केले. पारंपरिक नांदीने गीतांची सुरुवात झाली. त्यानंतर ‘लकडी की काठी’, ‘देते कोण देते कोण’, ‘नारायणा रमारमणा’,  अशी विविध गाणी वेद शुक्ला, स्नेहा नायर आणि प्रणाली बर्मन या मुलांनी सादर केली. गायत्री पाध्ये आणि कौशिक हडप यांनी तबला तसेच ढोलक-ढोलकीवर, तर प्रज्वल मुदवेडकर यांनी हार्मोनियमवर साथ केली. अथर्व बडवे, राधा अहिरे, स्वरांगी ठाकुरदेसाई यांनी साइड ऱ्हिदम सांभाळला. संपूर्ण मैफलीचे नेटके निवेदन शलाका नाईक यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना आणि मार्गदर्शन नीलिमा जोशी यांचे होते.

Story img Loader