महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला विभाग आणि अंबड इनरव्हील क्लब यांच्या वतीने ‘जाणून घ्या स्वत:ला’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी एकत्रित यावे, विचारांची देवाणघेवाण करावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबरच्या महिला समितीतर्फे सबलीकरणाचे उद्दीष्ट समोर ठेवून महिला उद्योजकता शिबीर, व्यक्तीमत्व विकास तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र चेंबरतर्फे करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून सहा मार्च रोजी महाराष्ट्र चेंबरच्या राठी सभागृहात दुपारी अडीच ते पाच या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकच्या यशस्वी नवउद्योजिका नेहा खरे यावेळी उपस्थित राहणार असून व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडून महिलांना यशस्वी होण्यसााठी उत्तम व्यक्ती कसे बनता येईल, आपल्या व्यक्तीमत्वाची छाप कशी पडेल यावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डॉ. मिथिला कापडणीस या होमिओपॅथी व अ‍ॅक्युपंक्चरिस्ट आरोग्य आणि आहार तसेच अ‍ॅक्युपंक्चर थेरेपी समजावून सांगतील. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून काँग्रेसच्या शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते उपस्थित राहणार असून याव्यतिरिक्त नाशिकमधील उद्योजिका, व्यावसायिका आणि अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यां उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, महिला समितीच्या नीलिमा पाटील आदींनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा