पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आयुक्त व महापौरांसह इतर सर्व पदाधिकारी, कर्मचारी या दिवशी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याकरिता दिवसभर सायकलचा वापर करणार आहेत.
आपले शहर आणि पर्यायाने निसर्गाची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे महापौर किशोर पाटील यांनी नमूद केले. जमीन, हवा, पाणी व ध्वनिप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने सुंदर, स्वच्छ, हिरवेगार व पाणीदार शहराच्या निर्मितीसाठी तसेच प्रदूषणमुक्त शहर निर्माण करण्यासाठी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. सकाळी सात वाजता काव्य रत्नावली चौकापासून सायकल फेरी काढण्यात येणार असून प्रसिद्ध सायकलपटू विनोद पुनामिया यांसह महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी या फेरीत सहभागी होणार आहेत. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या वाहनतळ जागेवर पर्यावरणाचे महत्त्व सांगणाऱ्या छायाचित्र व चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. जैन इरिगेशनतर्फे   कडुनिंब    तसेच    इतर    रोपांचे,    तसेच    साई  बहुउद्देशीय ट्रस्टकडून कागदी व कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे.
महापालिका, पर्यावरण शाळा, जाणता राजा प्रतिष्ठान आणि न्यू कॉन्झव्‍‌र्हर यांच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून पर्यावरण दिनाचे महत्त्वपर संदेश शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा हेतू आहे. त्यात युवाशक्ती, भरारी पथक सहभागी होणार आहेत.
सायकलचा पर्यावरण दिनी वापर करून आम्ही सर्व सुमारे दोन लाख रुपयांच्या इंधनाची बचत करण्यात यशस्वी होऊ, असे महापौर पाटील यांनी नमूद केले. केवळ या एकाच दिवशी नव्हे तर, सायकलचा अधिकाधिक वापर करून प्रदूषणमुक्त शहर निर्मितीसाठी सर्वानी हातभार लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा