इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळील पिंपळगाव मोर शिवारात केबीसी ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या केबीसी क्लब व रिसॉर्टचे भूमिपूजन भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
महागाईच्या युगात प्रत्येकाला निसर्गरम्य वातावरणातील रिसॉर्टमध्ये जाऊन मनोरंजन आणि आनंदाचे काही क्षण घालविणे अशक्य झाले आहे. या बाबीचा र्सवकष विचार करून हा प्रकल्प आखण्यात येत असल्याचे कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी यावेळी सांगितले. प्रत्येकाचे नोकरी, घर व गाडी असे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी उत्पन्नाच्या तुलनेत खर्च वाढत असल्याने सर्वसामान्यांना शक्य नसते. राज्यात सध्या मराठवाडा, विदर्भ येथे दुष्काळाने नागरिक हैराण असताना त्या भागातील अनेक बेरोजगारांना कंपनीच्या माध्यमातून व्यवसायाचा मार्ग मिळाला आहे. पुढील कालावधीत कंपनीच्या माध्यमातून केबीसी प्लॉटर्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे नाशिक व औरंगाबाद येथे निवासी संकुल उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही चव्हाण यांनी दिली. या वेळी कंपनीचे वितरक, प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘केबीसी ग्रुप’चा इगतपुरी तालुक्यात प्रकल्प
इगतपुरी तालुक्यातील घोटीजवळील पिंपळगाव मोर शिवारात केबीसी ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या केबीसी क्लब व रिसॉर्टचे भूमिपूजन भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

First published on: 07-03-2013 at 02:27 IST
TOPICSप्रोजेक्ट
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project in igatpuri by kbc group