प्रकल्पग्रस्त असूनही नोकरी मिळत नसल्याने शासनाचा निषेध म्हणून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मालेगाव व सटाणा तालुक्यातील दोघांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
सटाणा तालुक्यातील काकडगाव येथील देवराव अहिरे आणि मालेगाव तालुक्यातील आघार बुद्रुक येथील सुरेश पगारे हे दोघेही प्रकल्पग्रस्त आहेत. प्रकल्पग्रस्त म्हणून शासकीय सेवेत सामावून घेता येईल या आशेने त्यांनी अनेक परीक्षा दिल्या. न्याय मिळत नसल्याने दोनवेळा उपोषणाचा मार्गही पत्करला. परंतु दरवेळी त्यांची केवळ आश्वासन देऊन बोळवण करण्यात आली. शासनाच्या कोणत्याही खात्यात कोणत्याही पदावर काम करण्यास आपण तयार आहोत, असेही अहिरे व पगारे यांनी नमूद केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून न्याय देण्यात यावा अशी मागणी दोघांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Story img Loader