शहराच्या स्वच्छतेला सर्वाधिक महत्व देण्यात आले असून त्यासाठी कचरा संकलनाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे, नव्या साहित्याची खरेदी हा त्याचाच एक भाग आहे असे प्रतिपादन महापौर शीला शिंदे यांनी केले.
मनपाच्या वतीने आरोग्य खात्यातंर्गत कचरा विभागासाठी म्हणून २५ कंटेनर व २ मोठे डंपर खरेदी करण्यात आले. महापौर शिंदे यांच्या उपस्थितीत हे साहित्य कचरा विभागाकडे सुपुर्त करण्यात आले. उपमहापौर गीतांजली काळे, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, उपआरोग्यधिकारी डॉ. पैठणकर यावेळी उपस्थित होते. डॉ. डोईफोडे यांनी सांगितले की ४२ लाख ५० हजार रूपयांचे कंटेनक व डंपर खरेदी करण्यात आले आहेत. आता कचरा विभागाकडून कार्यक्षमतेने काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ हे कंटेनर ठेवावेत असे उपमहापौरांनी सांगितले.
मुख्य स्वच्छता निरिक्षक इम्तियाज शेख, श्री. वाघ, स्वच्छता निरिक्षक मंजूर शेख, स्वीय सहायक बाबू चोरडिया, राजेश लयचेटी, किशोर कानडे, विजय धनेश्वर यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा