कंत्राटदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक झालेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता गजानन खाडे याच्या संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच आहे. दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती बाळगून असणाऱ्या खाडेच्या स्थावर व जंगम मालमत्तेची मोजणी करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकाऱ्यांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. बेहिशेबी मालमत्तेची तपासणी अजूनही सुरूच असल्याने खाडेचे पायदेखील चिखलीकरएवढेच भ्रष्टाचाराच्या दलदलीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खाडे याची विविध बँकांमधील खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू असून बांधकाम विभागाने त्याच्या निलंबनाबाबतही कारवाई सुरू केली. उस्मानपुरा येथील संजय हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या खाडे याच्या घराची झडती घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळपर्यंत त्याची संपत्ती १० कोटी रुपये आहे, असे सांगितले जात होते. आजही त्याच्या संपत्तीची मोजदाद सुरू होती.

Story img Loader