कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या kbmc.gov.in या संकेतस्थळावरून मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन आणि टाटा कन्सलटन्सी सव्र्हिसेस यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाइन लि. या कंपनीकडून पेमेंट गेट वेची सुविधा घेण्यात आली आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये अशा प्रकारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा आहे. मात्र नगरपालिकांमध्ये कुळगांव-बदलापूर पहिलीच आहे.
बदलापूर शहरातील अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहराबाहेर जात असतात. अशा नागरिकांना या सेवेचा उपयोग होणार आहे. तसेच कर भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार आहे. ई-गव्र्हनन्स क्षेत्रात कुळगांव-बदलापूर पालिकेने बरीच प्रगती केली आहे.
पूर्वी जन्म दाखला मिळण्यासाठी आठ ते दहा दिवस लागायचे. आता अवघ्या १५ मिनिटात दाखला मिळतो.
ई-टेंडरींग, इमारत आराखडा छाननीसाठी उपयोगी सॉफ्टवेअर पालिकेत वापरले जातात. लवकरच मालमत्ता कराचे देयक नागरिकांना एसएमएसद्वारे दिले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा