जिल्हा सहकारी बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी बिगरशेतीसह शेतीकर्जाच्या थकबाकीदारांकडेही आता मोर्चा वळविला आहे. त्यानुसार आठही तालुक्यांतील पहिल्या दहा थकबाकीदारांची यादी तयार करून वसुली कारवाईसाठी या थकबाकीदारांविरुद्ध सहकार कायद्याच्या कलम १०१ किंवा आवश्यकतेनुसार फौजदारी प्रक्रियेचा प्रस्ताव सुरू आहे. या थकबाकीदारांकडे मुद्दल व व्याज मिळून १० कोटी २७ लाख ४० हजार १०५ रुपयांची रक्कम येणे आहे.
गेल्या १० वर्षांपासून कलम १ (१) अंतर्गत कारवाईच्या कचाटय़ात अडकलेल्या जिल्हा बँकेस कलमातून बाहेर पडण्यात व रिझव्र्ह बँकेचा परवाना मिळविण्यात यश आले असले, तरी आíथक चणचण कायम आहे. त्यामुळे पूर्वीचा थकीत कर्जवसुलीचा पर्याय अमलात आणण्याशिवाय बँकेकडे दुसरा मार्ग नाही. त्यानुसार बँकेने बिगरशेती कर्जापोटी अडकलेल्या शेकडो कोटींच्या थकीत कर्ज वसुलीस जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र, कणखर राजकीय भूमिके अभावी या प्रयत्नांना विशेष यश मिळाले नाही. अशाही स्थितीत बँकेने कलम ११मधून बाहेर पडून रिझव्र्ह बँकेचा परवाना मिळविला. या बरोबरच बँकेने शेतीसाठी घेतलेल्या व थकीत असणऱ्या कोटय़वधीच्या कर्जाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.
८० थकबाकीदारांकडे सव्वादहा कोटींची बाकी
बँकेची शेतीकर्जाच्या कर्जापोटी २ अब्ज ३३ कोटी ८८ लाख रक्कम येणे बाकी आहे. या सर्वाकडील थकीत रक्कम व व्याज वसूल केले जाणार असले, तरी बँकेने पहिल्या टप्प्यात तालुकानिहाय पहिल्या १० थकबाकीदारांकडील रक्कम वसुलीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. आठही तालुक्यांतील पहिल्या १० अशा ८० थकबाकीदारांकडे एकूण १० कोटी २७ लाख ४० हजार १०५ रुपयांचे येणे आहे. २ अब्ज ३३ कोटी ८८ लाखांची रक्कम थकीत व जिल्हा बँकेची सद्यस्थितीत वसुलपात्र रक्कम ५ अब्ज ८ कोटी ७४ लाख ३३ हजार रुपये आहे. पकी २ अब्ज ३३ कोटी ८८ लाख ६७ हजार रुपये थकीत वसुलपात्र असून, चालू बाकी २ अब्ज ७४ कोटी ८५ लाख ६६ हजार रुपये आहे. पकी जिल्ह्यातील पहिल्या ८० थकबाकीदारांकडे १० कोटी २७ लाख ४० हजार १०५ रुपये वसुलपात्र आहेत.

Story img Loader