केवळ पाठय़पुस्तकांवर अवलंबून न राहता स्वावलंबनाने ज्ञान कसे प्राप्त करता येईल यासाठी पुस्तकांशी मैत्री करावी, म्हणजे ग्रंथ वाचनाने समृद्धता येते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांनी येथील सारडा कन्या विद्या मंदिर येथे आयोजित ग्रंथालय सप्ताह समारोप कार्यक्रमात केले.
कविता ही उत्स्फूर्तपणे करता यावी म्हणून सर्वागाने वाचन करा, असा सल्लाही त्यांनी दिला. कवी ना. धो. महानोर, विठ्ठल वाघ यांच्या काव्य रचना त्यांनी म्हणून दाखविल्या. कवितेतून मी घडलो. काव्य लेखनाबरोबरच विविध चित्रपट गीतांचे लिखाणही करता आले, हे सांगतानाच त्यांनी कपाशीचे झाड, झुला या कवितांची निर्मिती कशी झाली ते नमूद केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व शालेय समिती अध्यक्ष रमेश देशमुख होते. व्यासपीठावर कार्यवाह शशांक मदाने, मुख्याध्यापिका सरोजिनी तारापूरकर, कवी अरविंद ओढेकर, प्रकाश वैद्य, पेठे हायस्कूलचे मुख्याध्यापक रा. गो. हिरे, मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी, मीनाक्षी वैद्य आदी उपस्थित होते.
ग्रंथालय सप्ताहातील विविध स्पर्धामध्ये पारितोषिके मिळविलेल्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. सप्ताहाचा आढावा ग्रंथपाल अरविंद दिघे यांनी घेतला. पाहुण्यांचा परिचय गीतांजली वैष्णव यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुरेखा सोनवणे यांनी केले. आभार प्रियंका निकम यांनी मानले. सप्ताहानिमित्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुस्तकांसाठी ७४०० रूपये मुख्याध्यापिका तारापूरकर यांच्याकडे दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा