उत्तराखंडातील जलप्रलयातील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी स्नेहालयच्या पुढाकारातून शहरातील वेश्या व तृतीयपंथी पुढे आले आहेत. एक दिवसाच्या कमाईचे १३ हजार ३०१ रुपये त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्याकडे सुपूर्द केले, तसेच महिनाभरात त्यासाठी १ लाख रुपये देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
पंतप्रधान सहायता निधीसाठी ही मदत देण्यात आली आहे. शिवाय आज या सर्वांनी एक दिवसाचा उपवास केला व हा शिधा आपदग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार आहे. उद्या (बुधवार) हा शिधा जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. शहरातील वेश्या व तृतीयपंथीयांनी याआधीही लातूर, गुजरातचा भूकंप, ओरिसातील चक्रीवादळ, त्सुनामी, मुंबईतील बाँबस्फोट, दुष्काळ अशा आपत्तीत २४ वेळा अशाच प्रकारे भरीव मदत केली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prostitute helps to uttarakhand calamity affected