नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी संस्थेकडून नोकरभरती करण्यात येणार असल्यास या भरतीला आपला विरोध असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांना पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदनही देण्यात आले.
सध्याच्या युगात संगणकीकरणावर भर देऊन अनावश्यक नोकर कपात करण्याचे धोरण सर्व बँका, सहकारी संस्था, पतसंस्था यांच्याकडून राबविण्यात येत आहे. मात्र आपल्या संस्थेने संगणकीकरणाकडे दुर्लक्ष करून शाखा सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. स्वहितासाठी नोकर भरतीचा घाट घातला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नवीन शाखांमुळे तेथील शाखा भाडे, साहित्य, संगणक, वीज देयक, दूरध्वनी देयक असा खर्च वाढतो. सभासद व जनहित सोडून स्वहितासाठी करण्यात येणाऱ्या नोकर भरतीमुळे संस्थेच्या लाभांश व ठेवीवरील व्याजावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होऊन सभासदांचे आर्थिक नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन नोकर भरतीस विरोध असल्याचे म्हटले आहे.
प्रकाश सोनवणे यांनी, वेळोवेळी मासिक सभांमध्ये नोकर भरती करू नये हा मुद्दा मांडला आहे. पाच ऑगस्ट २०१२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि २५ ऑगस्ट २०१३ रोजी चांदवड येथे झालेल्या वार्षिक सभेत मनसे शिक्षक सेनेने शाखा विस्तारासही विरोध केला. निवेदन देताना प्रा. पुरुषोत्तम रकिबे, प्रकाश वाघ, दशरथ जारस आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा