नगरपरिषद मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यांचे, सफाई कामगारांचे ६-७ महिन्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ७ महिन्यांचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच्या निषेधार्थ प्रजासत्ताकदिनी मंत्रालयापुढे  काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा इशारा प्रदीप औरसमल यांनी दिला.
बीड नगरपरिषदेच्या मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यांचे, सफाई कामगारांचे ६-७ महिन्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ७ महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नाही. तसेच वेतनातून कपात केलेले विम्याचे हप्ते व कर्जाचे पेमेंट संबंधित बँक आणि कार्यालयात पाठविले नाही.
मलेरिया कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आलेला ३ कोटी २५ लाख निधी नगरपरिषदेने विकासकामांवर खर्च केला. यास जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी मंत्रालयासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शन करण्याचा इशारा नगर परिषद कर्मचाऱ्याचा मुलगा प्रदीप औरसमल याने पत्रकाद्वारे दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest at mantralaya for balance salary on republic day