ओबीसी शिष्यवृत्ती आणि इतर मागण्यांसाठी मंत्री, खासदार व आमदारांच्या घरासमोर येत्या १ डिसेंबरला घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय ओबीसी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
विदर्भातील ओबीसी संघटनेची बैठक विदर्भ संघटक बबनराव फंड यांच्या अध्यक्षतेखाली जनता महाविद्यालयात नुकतीच पार पडली. या बैठकीला प्राचार्य डॉ.अशोक जीवतोडे, ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर, ओबीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शेषराव येलेकर, ओबीसी एकता मंच अध्यक्ष सुनील पाल, अ‍ॅड. भगवान पाटील, दिनेश चोखारे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रा. माधव गुरनुले, नंदू नागरकर, बळीराज धोटे, राजेंद्र खांडेकर, नितीन भाटारकर, बबन वानखेडे, अरुण भोस्कर, देविदास बानबले, प्रकाश देवतळे, राजेंद्र लांजेवार, बबनराव राजुरकर, बबनराव वानखेडे, गजानन अगडे, वासूदेव आस्कर, अविनाश पाल, दिगांबर चौधरी, विवेक लेनगुरे, विजय मोरे, बंडू डाखरे, राजेंद्र खाडे, गोविंद पोडे, सुनील आवारी, दिवसे, केशव जेनेकर, संजय पोहनेकर, नागापुरे आदि उपस्थित होते.
या बैठकी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शासनाने ओबीसी संदर्भात अन्यायकारक धोरण राबवित असून सरकारची ओबीसी समाजबांधवाबद्दल उदासीनता लक्षात येत आहे. ओबीसी शिष्यवृत्ती, नॉनक्रिमीलेअरसंदर्भाती परिपत्रक, ओबीसी जनगणना आदी मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. येत्या १ डिसेंबरला लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.
या घंटानाद आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.