बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आंबेडकर चौकात सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यासह विदर्भातील इतरही भागात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला
अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नये, यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमित सनी यांना दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यानंतर स्थानिक आंबेडकर चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी ही बॉम्बस्फोटाची घटना िनदनीय असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी दिलेल्या निवेदनातून या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
या घटनेचा जिल्ह्यातील समस्त बौद्ध समाजबांधवांच्या वतीने तीव शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना माजी आमदार दिलीप बन्सोड, रत्नदीप दहिवले, संजय टेंभरे, शुद्धोधन शहारे, प्रशांत बागळे, अजय येचवानी, राजीव दोनोडे, सचिन बन्सोड, प्रतीक भालेराव, महेंद्र टेंभेकर, अश्वीन नंदेश्वर, प्रफुल्ल भालेराव, लक्ष्मण चंद्रिकापुरे, के.बी.बन्सोड, के.बी. चव्हाण, सी.झेड. गजभिये, रूपदास मेश्राम, वंदना चव्हाण, सुशीला भालेराव, कुंदा चंद्रिकापुरे, पौर्णिमा वालदे, डी.एच.डोंगरे, पंचफुला मेश्राम, सुरेंद्र खोब्रागडे, सी.बी.वालदे, डी.सी. कानेकर, प्रफुल्ल भालेराव, एस.आर.चवरे, भीमराव माने, हनवत मेश्राम, प्रकाश डोंगरे, नयन खोब्रागडे, भरत डोंगरे व समस्त समाजबांधव उपस्थित होते.
माजी आमदार दिलीप बनसोड यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देऊन तिरोडय़ातही निषेध व्यक्त केला. या घटनेचा तिरोडा तालुका बौद्ध बांधव व सर्व समाजबांधवाच्या वतीने तिव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार दिलीप बंसोड, भजनदास वैद्य, बी.व्ही. गोंडाणे, उपाध्यक्ष व्ही. डी. मेश्राम, सचिव सुरेश बनसोड, टी. एस. वैद्य, कृष्णापती रामटेके, सुरेंद्र गेडाम, लक्ष्मीकांत मेश्राम, हरिश्चंद्र सूर्यवंशी, पी. एस. मेश्राम, छोटू वासनिक, बुद्धराम, तेजराम मेश्राम, राजू वासनिक, पं. स. सभापती ललिता जांभूळकर, दिनेश भवसागर, नगरसेवक विजय बंसोड, प्रल्हाद जांभूळकर, वंदना मेश्राम उपस्थित होते.
आर्णीकरांचा मोर्चा
यवतमाळ येथील आर्णीकर गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या निषेध मोर्चात समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन तहसीलदारांना एक निवेदन सादर करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही केली. तहसीलदारांना येथील नगराध्यक्ष अनिल आडे, उपनगराध्यक्ष आरीज बेग, सभापती अनिता भगत, प्रदीप भगत, कांतीलाल कोठारी, सुनील भगत, अनिल इंगोले, अनिल भगत, अशोक घोंगडे, अमर भगत, एन. डी. मनवर आदी मंडळींनी निवेदन सादर केले. नंतर झालेल्या सभेत नगराध्यक्ष आडे व उपनगराध्यक्ष बेग यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
रायपूर येथे शांती मार्च
बोधगयामधील महाबोधी विहारावर दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे बुधवारी सकाळी शांतीमार्च काढण्यात आला. या वेळी ठाणेदार सातपुते यांना निषेधाचे निवेदन देत बॉम्बस्फोट करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
या घटनेचा जिल्हाभरात ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात येत आहे. रायपूर येथेही या घटनेचा निषेध म्हणून शांतीमार्च काढण्यात आला. समाजसेवक अनिल लहाने यांच्या नेतृत्वाखाली बौद्धवाडय़ापासून या मार्चची सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायतीसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्धवंदना घेऊन महामानवांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रायपूरचे ठाणेदार बी.बी. सातपुते यांना घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
या मार्चमध्ये ग्रामपंचयत सदस्य रमेश सरकटे, बलदेव लहाने, अशोक खिल्लारे, दगडू खिल्लारे, माधव सरकटे, हिंमतराव नरवाडे, हिंमतराव जाधव, प्रकाश अंभोरे, जनक खिल्लारे, प्रल्हाद खिल्लारे, दीपक खिल्लारे, शशिकला लहाने, रंजना खरे, छायाबाई खिल्लारे, शोभाबाई खिल्लारे, मंदाबाई खिल्लारे, कमलबाई खिल्लारे, आशाबाई लहाने यांच्यासह गावातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
चामोर्शीत कडकडीत बंद
गडचिरोली येथेही बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनेचे तीव्र पडसाद गडचिरोली जिल्ह्य़ात उमटले असून या घटनेचा जिल्ह्य़ातील विविध बौद्ध संघटना व बौद्ध बांधवांनी निदर्शने, बंद, मोर्चा आदी माध्यमातून निषेध व्यक्त केला. मंगळवारी अहेरी तालुक्यात कडकडीत बंद पाळून बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढून नंतर दहन करण्यात आले, तर बुधवारी चामोर्शी येथे कडकडीत बंद पाळून तीव्र निषेध करण्यात आला.
चामोर्शी येथील बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, चहा टपऱ्या, पानठेले दिवसभर बंद होते. बौद्ध संघटनांचे कार्यकर्ते सकाळपासूनच बंद पाळण्यासाठी सक्रिय होते. मंगळवारी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात विविध बौद्ध संघटनांनी निदर्शने करून तीव्र निषेध नोंदवला.
येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), तसेच अन्य पक्ष व संस्थांनीही विविध मार्गानी निषेध व्यक्त केला. देसाईगंज येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने निषेध केला. या निषेधाचे निवेदन उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांच्यातर्फे राष्ट्रपतींना पाठवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा