सोनईतील तिहेरी हत्याकांडाच्या तपासात पोलीस बोटचेपेपणाची भुमिका घेत असून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करत लोकअधिकार संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले व त्यांच्या भावना सरकापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले. अनंत लोखंडे, अरूण जाधव, मेहबूब सय्यद, बापू ओहोळ,
विजय काळे, शिवाजी गांगूर्डे, सुधीर साळवे, माणिक वाघ,
साहेबराव पाचारणे आदींचा
आंदोलनात सहभाग होता.
पालकमंत्री बबनराव पाचपुते, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या. बराच काळ प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही, त्यामुळे आंदोलक संतप्त झाले. निषेधाच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदूमवून टाकला. काहींनी डॉ. जाधव यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. अखेर डॉ. जाधव यांनी स्वत:च बाहेर येऊन आंदोलकांकडून निवदेन स्वीकारले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा