बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या निषेधासाठी बुधवारी (दि. १०) विविध संघटनांनी औरंगाबाद येथे निषेध मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. मोर्चादरम्यान व्यापारी आपली दुकाने उघडणार नाहीत, असे व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांनी सांगितले.
दरम्यान, लातूर, नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोलीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. सोमवारी दिवसभर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोपरा सभा घेऊन कशा पद्धतीने निषेध व्यक्त केला जाईल, याची आखणी केली. महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात दुपारी साडेबारा वाजता या अनुषंगाने विशेष बैठक घेऊन घटनेचा निषेध करण्यात आला. खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, माजी खासदार उत्तमसिंग पवार यांसह विविध राजकीय पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बुधवारी औरंगाबादकरांच्या वतीने घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा