मराठा विद्या प्रसारक समाज संचालित येथील समाजकार्य महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे झाले. शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर पथनाटय़े सादर करून जनजागृती केली.
शिबिराचे उद्घाटन द्राक्ष बागाईतदार संघाचे संचालक सुरेश कळमकर, मोहाडी सोसायटीचे अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमुख, प्राचार्य विलास देशमुख, डॉ. राजेंद्र सावंत, संजय डिंगोरे, राजेंद्र कळमकर उपस्थित होते. शिबिरात श्रमदान, व्याख्याने, योग शिबीर, जनजागरण फेरी, पथनाटय़, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम झाले. डॉ. पुरुषोत्तम पुरी यांचे ‘रक्तदान सर्वश्रेष्ठ दान’, अमोल कुलकर्णी यांचे ‘ध्येय निश्चिती’, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक भास्करराव कोल्हे यांचे ‘राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग’, संजय डिंगोरे यांचे ‘संस्कृतीचे उपासक युवक’, मंगेश सूर्यवंशी यांचे ‘क्षेत्रकार्यातील सूक्ष्म नियोजन’ या विषयांवर व्याख्यान झाले. याशिवाय विद्यार्थ्यांनी गावातील विविध वस्त्यांमध्ये एचआयव्ही एड्स, स्त्रीभ्रूण हत्या, सार्वजनिक स्वच्छता, स्त्री-पुरुष समानता, हुंडा बंदी आदी विविध विषयांवर पथनाटय़ सादर केली. विद्यार्थ्यांनी पतंजली योग शिबिराचे आयोजनही केले.
शिबिराचा समारोप मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेते प्रवीण जाधव, कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, दिंडोरीचे तहसीलदार गणेश राठोड, दिंडोरीचे पोलीस निरीक्षक विलास कोहिनकर, उपसरपंच कल्पना जाधव, बापूसाहेब पाटील, प्राचार्य विलास देशमुख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत शिरसाट यांनी केले. आभार दीपाली चौधरी यांनी मानले. कल्याणी पाळदे हिने अहवाल वाचन केले तर तृप्ती बैरागी, जगदीप कवाळ यांनी मनोगत व्यक्त केले.   

Story img Loader