कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय १५० वर्षे पूर्ण करीत असल्याने या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त वाचकांना वाचनालयातर्फे १२ तास सेवा देण्याचा निर्णय वाचनालय समितीने घेतला आहे.
 एका कार्डवर दोन पुस्तके देणे आणि संगणकीकरणाच्या माध्यमातून यापुढे पुस्तकांची देवघेव सुरू करण्यात आली आहे, असे विश्वस्त माधव डोळे यांनी सांगितले. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत वाचनालय खुले असणार आहे. कल्याणचे तत्कालीन मामलेदार सदाशिवराव भाऊ साठे यांनी ३ फेब्रुवारी १८३४ रोजी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. १८८० मध्ये वाचनालयाचे ३५० ग्रंथ आणि ४३ सभासद होते. आता वाचनालयात ६४ हजारांची विविध विषयांवरील ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. दीड हजार सभासद आहेत. ब्रिटिश गॅझेटियरमध्ये या वाचनालयाचा उल्लेख आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा