शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून सर्वपक्षीय लोकांची कामे केली, कामे करताना कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना कधीही कोणाची जात, गाव, पक्ष न विचारता प्रामाणिकपणे सेवा केली. केलेल्या कामाची पावती म्हणून जनता याहीवेळी मला निश्चित न्याय देईल अशी खात्री खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दोनदिवसीय बैठकीच्या सामारोपप्रसंगी अध्यक्षपदावरून वाकचौरे बोलत होते. तालुका संपर्कप्रमुख अनिल कोकीळ (मुंबई), उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी जिल्हाध्यक्ष सुहास वहाडणे आदी या वेळी उपस्थित होते. वाकचौरे यांनी या वेळी  विरोधकांवर टीकेचा भडिमार केला. गेल्या चार, पाच वर्षांत खासदार म्हणून जी कामे केली ती जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. खासदार म्हणून काम करताना काही चुका झाल्या असतील त्या पुढील काळात दुरुस्त केल्या जातील असे वाकचौरे यांनी स्पष्ट केले.
कोकीळ म्हणाले, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. त्यांनाही शिवसेना नक्कीच न्याय देईल. गोरगरीब जनता व शेतक-यांवर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम शिवसेना करते. या वेळीही शिर्डी मतदारसंघात पुन्हा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तालुकाप्रमुख कमलाकर कोते यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पक्षाची नवी कार्यकारिणी या वेळी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे आहे. तालुका उपप्रमुख- अनिल बागरे, सावळेराम डांगे, भानुदास कातोरे, विठ्ठल पवार, अंबादास नळे व नितीन वाकचौरे. सचिव- राहुल गोंदकर, विभागप्रमुख- पुंडलिक बावके, डॉ. गुलाब गोरे, सतीश गुंजाळ, राजेंद्र भालेराव व भास्कर मोटकर. जि. प. गटप्रमुख- अमोल वहाडणे (पुणतांबा), वसंत डोखे (वाकडी), किरण दंडवते (साकुरी), दीपक विखे (लोणी खुर्द) व सागर राजेंद्र मोरे (कोल्हार बुद्रुक). पं.  स. गणप्रमुख- अशोक काळे (पुणतांबा), बाळासाहेब आबक (सावळीविहीर), नवनाथ हेकरे (साकुरी), गोरख गाढवे (अस्तगांव), महेश कारभारी जाधव (वाकडी), सोमनाथ गोरे (लोहगांव), नंदू वाकचौरे (कोल्हार बुद्रुक) व आशिष गाडेकर (दाढ बुद्रुक). सल्लागार- सुहास वहाडणे, रावसाहेब जपे, दीपक गायकवाड व सुभाष तुरकणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा