महावितरणने ७ हजार विद्युत सहायकांची निवडसूची ११ एप्रिलपर्यंत लावावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहरोद्दीन यांनी केली. सरळसेवा भरतीच्या माध्यमातून १३ परिमंडळांतून लाखावर उमेदवारांच्या अर्जाची छाननी त्रयस्थ संस्थेमार्फत करावी व गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी गुढीपाडव्यापर्यंत लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महावितरणमध्ये ठेकेदारांमार्फत हजारो कामगार कंत्राटी आहेत. त्यांना तुटपुंजे वेतन मिळते व त्यांची आर्थिक पिळवणूकही केली जाते. त्यामुळे विद्युत सहायकांची भरती व्हावी, या साठी संघटनेने बरेच प्रयत्न केले. या जागा तातडीने भरता याव्यात, म्हणून गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी तातडीने प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली. लातूर क्षेत्रात २६९, तर औरंगाबाद क्षेत्रात १६० विद्युत सहायकांच्या जागांवर भरती होणार आहे.
‘७ हजार वीज सहायकांची निवड सूची जाहीर करावी’
महावितरणने ७ हजार विद्युत सहायकांची निवडसूची ११ एप्रिलपर्यंत लावावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहरोद्दीन यांनी केली.
First published on: 09-04-2013 at 02:14 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Publish list of 7 thousand electricity assistant