महावितरणने ७ हजार विद्युत सहायकांची निवडसूची ११ एप्रिलपर्यंत लावावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहरोद्दीन यांनी केली. सरळसेवा भरतीच्या माध्यमातून १३ परिमंडळांतून लाखावर उमेदवारांच्या अर्जाची छाननी त्रयस्थ संस्थेमार्फत करावी व गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी गुढीपाडव्यापर्यंत लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महावितरणमध्ये ठेकेदारांमार्फत हजारो कामगार कंत्राटी आहेत. त्यांना तुटपुंजे वेतन मिळते व त्यांची आर्थिक पिळवणूकही केली जाते. त्यामुळे विद्युत सहायकांची भरती व्हावी, या साठी संघटनेने बरेच प्रयत्न केले. या जागा तातडीने भरता याव्यात, म्हणून गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी तातडीने प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली. लातूर क्षेत्रात २६९, तर औरंगाबाद क्षेत्रात १६० विद्युत सहायकांच्या जागांवर भरती होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा