विख्यात समीक्षक-विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे महत्त्वाचे लेखन नव्या वाचकांना उपलब्ध करून देण्याच्या ग्रंथमालिकेतील ‘निवडक नरहर कुरुंदकर’ या पहिल्या खंडाचे प्रकाशन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते उद्या (शनिवारी) येथे होत आहे.
कुरुंदकर यांची महत्त्वाची ग्रंथसंपदा त्यांच्या हयातीतच प्रकाशित झाली. पण १९८२मध्ये निधन झाल्यावर त्यांचे लेख व भाषणांचे संकलन करून अनेक पुस्तके निघाली. या सर्व ग्रंथसंपदेतील महत्त्वाच्या लेखांची निवड करून युवा पत्रकार व ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी ‘निवडक नरहर कुरुंदकरां’च्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली. व्यक्तिवेध प्रकारातील पहिला खंड नुकताच साकारला. त्यात २१ लेखांचा समावेश आहे. देशमुख आणि कंपनी, तसेच नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान यांच्या वतीने कुसुम सभागृहात दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होईल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रमुख म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विनोद शिरसाठ व प्रकाशक रवींद्र गोडबोले हेही उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा