रोटरीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पोलिओ निर्मूलन मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू आहे. लातूर येथे या मोहिमेचा प्रारंभ पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील टाऊन हॉल येथून यानिमित्त फेरी काढण्यात आली. रोटरीचे अध्यक्ष विश्वनाथ इंगळे, सुधीर लातुरे, आशुतोष वारद, महेश कंदगल, डॉ. ओम मोतीपवळे, रवि जोशी, देवीकुमार पाठक, बसवराज उटगे, लितेश शहा, लक्ष्मीकांत सोनी, संतोष कासले आदी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने पोलिओ मोहीम राबवण्यात आली. मोहिमेचे उद्घाटन महापौर स्मिता खानापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपमहापौर सुरेश पवार, सभापती राजकुमार जाधव, राम कोंबडे, कैलास कांबळे, अॅड. समद पटेल, विक्रमसिंह चौहान, अतिरिक्त आयुक्त शिवाजी िशदे, महेश पाटील आदी उपस्थित होते. जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांच्या हस्ते गंगापूर येथे या मोहिमेचा प्रारंभ झाला. जि.प. आरोग्य अधिकारी डॉ. डी. एम. धनवे, संगीता िशदे, डॉ. कानडे आदी उपस्थित होते.
राज्यपाल चाकूरकरांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
रोटरीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पोलिओ निर्मूलन मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू आहे. लातूर येथे या मोहिमेचा प्रारंभ पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
First published on: 21-01-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pulse polio campaign in hand by shivraj patil chakurkar