पुणे- अमरावती ही मागील वर्षांच्या रेल्वे अंदाजपत्रकात जाहीर केलेल्या गाडीला अखेर मुहूर्त मिळला असून, तीन मार्चपासून ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक मार्चपासून या गाडीचे आरक्षण सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. पुणे- अमरावती- पुणे ही गाडी आठवडय़ातून दोनदा धावणार आहे. पुणे- अमरावती मार्गावर रविवारी व शुक्रवारी, तर अमरावती- पुणे या मार्गावर सोमवारी व शनिवारी ही गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीला एकूण १५ डबे असणार आहेत. त्यास सहा अनारक्षित डब्यांचा समावेश असणार आहे. उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, बारसी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, िहगोली, वासीम, मूर्तीजापूर, बडनेरा या स्थानकावर या गाडीला थांबे देण्यात आले आहेत.
पुणे-अमरावती एक्स्प्रेस उद्यापासून धावणार
पुणे- अमरावती ही मागील वर्षांच्या रेल्वे अंदाजपत्रकात जाहीर केलेल्या गाडीला अखेर मुहूर्त मिळला असून, तीन मार्चपासून ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
First published on: 02-03-2013 at 03:31 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune amravati express starts from tomorrow