क्रीडा व युवक संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील अभिनव शिक्षण संस्थेत घेण्यात आलेल्या सतरा वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूर तर मुलींच्या गटात पुणे संघाने अिजक्यपद मिळवले. दोन्ही गटात या दोन जिल्ह्यांच्या संघातच अंतिम लढत झाली. या स्पर्धेतून राज्य संघाची निवड करण्यात आली, ती खालीलप्रमाणे.
मुले- चिराग आंगेलकर (मुंबई), आदित्य कांबळे (मुंबई), पियुश भंगाळे (पुणे), जयप्रकाश मोहिते (पुणे), विशाल बोदर (लातूर), ऋषिकेश साळुंके (कोल्हापूर), दशरथ जाधव (कोल्हापूर), रोहन जाधव (कोल्हापूर), ऋषिकेश मुचविडे (मुंबई), गोरख पवार (नाशिक), तेजस मगर (पुणे), व्यंकटी महात्मे (औरंगाबाद) तसेच राखीव खेळाडू गणेश मदने (कोल्हापूर), प्रविण मगर (पुणे), तुषार सोनवणे (नाशिक), सचिन सोनार (मुंबई) प्रतिक बांगर (पुणे), उमेश राऊत (नागपूर) या खेळाडूंचा समावेश आहे.
मुली- प्रणाली बेणके (पुणे), काजल भोर (पुणे), करिश्मा रिकीबदार (कोल्हापूर), काजल वाघ (पुणे), अमृता कोकीदकर (कोल्हापूर), गिता हाके (लातूर), टिंकल नांदोडे (नाशिक), आरती कदम (मुंबई), निकीता मरकड (पुणे), कविता घाणेकर (मुंबई), श्रुती सकपाळ (मुंबई), शर्वरी चोरमले (कोल्हापूर) यांच्यासह राखीव खेळाडू किरण गव्हाणे (पुणे), पुजा साळुंके (औरंगाबाद), अंजली चव्हाण (नाशिक), सोनी काळे (औरंगाबाद), मयुरी मांडवगडे (नागपूर), शामल मेटे (लातूर).
येथील अभिनव शिक्षण संकुलात दोन दिवस ही स्पर्धा पार पडली. अकोल्यात प्रथमच राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते तर पारितोषिक वितरण सुवर्णकन्या श्रध्दा घुले हिच्या हस्ते करण्यात आले. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले अध्यक्षस्थानी होते.