जंगलीमहाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील तीन आरोपींना सदनिका भाडय़ाने मिळवून देणारा व घरमालक यांच्याविरुद्ध पोलिसांना माहिती न दिल्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरमालक युसूफ बाबुमियाँ शेख (वय ५५, रा. केशवनगर, कासारवाडी) आणि एजंट गोपीचंद पारेख (रा. शास्त्रीनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलीमहाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर ते कासारवाडी येथे राहिल्याचे उघड झाले होते. या घटनेतील आरोपी फिरोज सय्यद, असद खान व इम्रान खान यांनी कासारवाडी येथील ही सदनिका तीन महिन्यांसाठी भाडय़ाने घेतली होती. भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असताना दिलेली नसल्याचे उघड झाले.
कासारवाडी येथील घरमालक व एजंटच्या विरुद्ध गुन्हा
जंगलीमहाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातील तीन आरोपींना सदनिका भाडय़ाने मिळवून देणारा व घरमालक यांच्याविरुद्ध पोलिसांना माहिती न दिल्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published on: 16-10-2012 at 06:06 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune serial blast police lodge fir against flat owner and agent