प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुणे- हजरत निजामुद्दीन या मार्गावर पुण्याहून १९ ऑक्टोबरला विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे. पुणे स्थानकावरून १९ ऑक्टोबरला रात्री दहा वाजता ही गाडी सोडण्यात येईल. २१ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून १० मिनिटांनी ही गाडी निजामुद्दीनला दाखल होईल. निजामुद्दीन येथून २१ ऑक्टोबरला सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी ही गाडी पुण्यासाठी सोडण्यात येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी ती पुण्यात दाखल होईल. पुणे-निजामुद्दीन या गाडीला दौंड, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा या स्थानकावर थांबा असेल. निजामुद्दीन-पुणे या गाडीला इटारसी, भोपाळ, बिना, झाँसी, ग्वाल्हेर, आग्रा व मथुरा या स्थानकावर थांबा असेल. या गाडीचे आरक्षण १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune to hazrat nizamuddin station special train run
Show comments