विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली असून, त्यानंतर पक्षात बंडखोरी उफाळली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले नारायण पाटील यांनी आमदारकीचा आणि शिवसेना सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होण्यापूर्वीच शिवसेनेत बंडाळीचे पेव फुटले आहे. माजी आमदार अण्णासाहेब माने आणि त्यांचे पुत्र व युवासेनेचे जिल्हाधिकारी संतोष माने यांनी शिवसेनेतून बाहेर पडत गुरूवारी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर आता
करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार नारायण पाटील यांनी आमदारपदाचा आणि शिवसेना सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
नारायण पाटील यांनी गुरुवारी दुपार पर्यंत वरिष्ठांच्या सांगण्यावरून उमेदवारीची वाट पाहिली.माञ मंञी तानाजी सावंत यांच्या हट्टाने नारायण पाटील यांना उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या आमदारपदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
नारायण पाटील हे करमाळा-माढा मतदारसंघाचे आमदार आहेत. सोलापूर जिल्ह्यातून ते शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेनेकडून नारायण पाटील यांचा पत्ता कट करून रश्मी बागल यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. रश्मी बागल यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली.
दरम्यान, आमदार नारायण पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले जात होते. गुरूवारी दुपारी मातोश्रीच्या सांगण्यावरून मंञी सावंत यांची सोनारी (ता.परांडा) येथे नारायण पाटील यांची भेट घेतली. माञ सावंत यांनी त्यांना विधान परिषदेचे आश्वासन दिले.
विधान परिषदेच्या आश्वासनानंतर आमदार नारायण पाटील यांनी थेट जेऊरमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर तडकाफडकी आमदारकी आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नारायण पाटील यांनी शिवसेना सोडली. मात्र, ते दुसऱ्या पक्षात जाणार की अपक्ष लढणार ? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील हे शिवसेनेकडुन विजयी झाले होते. गेली पाच वर्षात त्यांची मतदारसंघात कामेही चांगली आहेत. माञ भाजप व मोहिते पाटील यांच्याशी असलेली जवळीक ही कारणे देत त्यांची उमेदवारी कापण्यात आल्याचे समजते. त्यांची उमेदवारी कापल्याने त्यांच्या समर्थकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.