सातऱयाहून करमाळ्याला जाणाऱया एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीर ठार झाले असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. अकलूजजवळ हा अपघात झाला असून, एका दुचाकीला चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, एसटीचा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. मृतांची ओखळ पटविण्यात देखील अडचण येत आहे. अपघातात ठार झालेल्या तीन जणांपैकी आतापर्यंत एकाची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी वाचा