नातेवाईकांसोबत चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या एका महिलेची छेड काढणाऱ्या पंजाबमधील अमृतसर येथील चार तरुणांना नागरिकांनी बदडून पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून चारही तरुणांना अटक केली. मुरंदरजीत सरदार वेलसिंग भट्टी (१९), हरमनदीप तुलबीसिंग (२०), दीपकमल प्रल्हादसिंग अडवास (२०), अनिलकुमार रमेशकुमार वाटीका (२२) अशी आरोपींची नावे असून ते पंजाब प्रांतातील अमृतसर शहरातील रहिवासी आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास एक ३६ वर्षीय महिला नातेवाईकांसोबत सिनेमॅक्स इंटरनिटी मॉलमध्ये चित्रपट बघावयास गेली होती. यावेळी आरोपी मुरंदरजीतने त्या महिलेला ‘आय लव्ह यू’ म्हटले तर दीपकमलने त्या महिलेचा हात धरून छेड काढली. हा प्रकार लक्षात येताच या महिलेच्या बहीण जावयाने आरोपींना अटकाव केला, तेव्हा चारही आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. खरा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी चारही आरोपींना चांगलेच बदडून काढले व नंतर त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा