१९ ७२ ते १९८७ या  कालखंडात राज्यशासनाच्या शिक्षण विभागात विविध प्रशासकीय प्रमुख पदांवर कार्य करण्याची संधी मला मिळाली. शिक्षक व मुख्याध्यापक विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेऊ लागले. त्या कार्यात पुण्याच्या कॅम्प विभागातील हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्र. द. पुराणिक अग्रस्थानी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या चेल्यांपैकी एक पुराणिक सर होते. ‘आधी केले, मग सांगितले’ हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे त्यांच्या हिंदी हायस्कूलला त्या काळी अनेक पुरस्कार मिळाले. उद्योगपती किलरेस्करांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ व सुंदर शाळा’ योजना त्यांनी यशस्वी केली. त्यांच्या विद्यालयाला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार मिळाला व त्यांना स्वत:लाही गुणवंत शिक्षकांसाठी असलेला राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय एकात्मतेच्या आपल्या प्रयोगावर आधारित त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे राष्ट्रपतींच्या हस्ते विमोचन झाले. पुराणिक सरांनी आपल्या शाळा भेटींमधून अनेक शिक्षक, प्रशिक्षक व प्रशासक यांना अशा कार्याची प्रेरणा दिली. ‘शिक्षण क्षेत्रातील तीर्थक्षेत्र’ असा गौरव त्यांच्या विद्यालयाला मिळाला. पुराणिक सरांनी बालपणापासून प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यश मिळवले. अनेकांना संसार यशस्वी करण्यास हात दिला. स्वत:च्या पलीकडे बघण्याची निर्मळ दूरदृष्टी त्यांच्याजवळ होती, सामाजिक बांधिलकी मानणारी त्यांची वृत्ती होती.

आपल्या निश्चित केलेल्या दिशेने त्यांची वाटचाल निवृत्तीनंतरही तितक्याच उत्साहाने होत होती. सर्वश्री सुधाकर प्रभु, पु. ग. वैद्य, वासू देशपांडे, व. द. देसाई, मालतीताई साठे, भडभडेबाई, वत्सलाबाई घाटे या व अशा अनेक समविचारी शिक्षक व मुख्याध्यापक बंधुभगिनींना बरोबर घेऊन संघटितपणे शैक्षणिक परिवर्तनाचे कार्य अखंड करणारे हे व्यक्तिमत्त्व, अंधारलेल्या वातावरणातही केवळ उक्तीने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने प्रकाशाचा मार्ग दाखविणारे हे खंबीर नेतृत्व निष्काम कर्मयोगाचा आदर्श घालून देणारे असे हे कार्यकुशल व्यक्तिमत्त्व. आपल्या सुजाण सहधर्मचारिणीच्या खंबीर साथीने समाजाला व विशेषत: शिक्षण क्षेत्राला अभिमान वाटावा असा स्वत:चा संसार तर त्यांनी नेटका केलाच, पण त्याबरोबरच आपल्या संस्थेचा कारभारही आदर्श करून दाखवला.

असे प्र. द. पुराणिक या नावाने सर्वार्थाने आदर्श असे व्यक्तिमत्त्व- प्रेरक तसेच गतिवर्धक, सश्राव्य तसेच चिंतनशील आणि कर्तृत्वसंपन्न तसेच जीवनमूल्यांचा अखंड पाठलाग करणारे चरित्र. त्यांच्या पावनमंगल स्मृतीस नम्र अभिवादन.

– वि. वि. चिपळूणकर

माजी शिक्षण संचालक,महाराष्ट्र राज्य