पहिल्या टप्प्यात दिली जाणारी उचल वाढवून मिळावी, यासाठी पूर्णा कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
उसाची पहिली उचल रक्कम २१५० मिळावी, या मागणीसाठी डोंगरकडा व पूर्णा साखर कारखाना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी साखळी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले होते. आमदार दांडेगावकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ऊसदर एफ.आर.पी.नुसार दिला जाईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब अडकिणे, किशनराव होडगे, हृषीकेश बर्वे, उत्तमराव जगताप आदी या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा