येत्या २० ऑक्टोबरला होणाऱ्या धरणे आंदोलनात पाणीप्रश्नी सरकारला जाब विचारणार असल्याचे जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले.
मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विभागातील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर जनता विकास परिषदेतर्फे २० ऑक्टोबरला दुपारी १२ ते ३ पर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
काब्दे यांनी आखाडा बाळापूर, कळमनुरी, हिंगोली येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. आंदोलनाचा रेटा असल्याशिवाय सरकारला जागच येत नाही. त्यामुळे या आंदोलनाचे आयोजन केले आहे. आंदोलनात मोठय़ा संख्येनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जनता   विकास   परिषदेने केले आहे.     

Story img Loader